Ad will apear here
Next
‘...तर राहुल गांधींना विरोध करण्याचा अधिकार नाही’
मुंबई : ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत, तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना मांडली.

ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते काही बोलले असतील की, पवारसाहेब हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत तर तसे नाही. शरद पवारसाहेबांनी वारंवार स्पष्ट केले आहे की, आमची मर्यादा काय आहे हे आम्हाला कळते. त्या पदासाठी आम्ही कधीही दावेदार राहणार नाही. ही भूमिका वारंवार पक्षामार्फत स्पष्ट करण्यात आली आहे. आज ज्याप्रकारे या देशात परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठेतरी सत्ताबदल निश्चित आहे. ज्याप्रकारे निकाल येईल त्यावेळी निर्णय होणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZUOBO
Similar Posts
‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला पूणे येथे होत असून, त्यानिमित्त राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभाही याचदिवशी पार पडणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
‘‘राष्ट्रवादी’चे काँग्रेस पक्षात विलीनीकरणाचे वृत्त तथ्यहीन’ मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही,’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केले आहे.
शरद पवार १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर; सोलापुरातून सुरुवात मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते सोलापूर येथून करणार आहेत.
खासदार चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेसाठी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी आठ मार्च २०१८ रोजी विधानभवनामध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language